मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट असते.
विविध ठिकाणी गेल्यानंतर ती फोटो काढून सोशल मीडिया अकाऊंट्सवर पोस्ट करत असते.
उर्मिला कोठारेने आज रविवारच्या दिवशी सुट्टीचा आनंद कुटुंबासोबत घेतला. या फोटोत तिची लहानशी मुलगी जिजा देखील दिसत आहे. सशांसोबत काही फोटो तिने काढले आहेत.
आपल्या हातांवर कुठलासा पक्षी दाखवत उर्मिला पक्षाबद्दलची माहिती जिजाला देताना दिसत आहे. जिजादेखील कुतुहलाने आईकडून माहिती ऐकत आहे.
पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडेमध्ये तिने हे फोटो काढले आहेत. तसं तिने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मेंशन केलं आहे.