उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती दुसऱ्या लग्नानंतर हनिमूनवर; पत्नीसोबत शेअर केले रोमँटिक फोटो
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती मोहसिन अख्तर मीर काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. मोहसिनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दुसऱ्या पत्नीसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती मोहसिन अख्तर मीरने काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केलं. निधा भट्टशी मोहसिनने निकाह केला असून दोघंही सध्या एकमेकांसोबत निवांत आणि रोमँटिक वेळ घालवत आहेत. मोहसिनने 14 जून 2026 रोजी इन्स्टाग्राम अकाऊंटवर निकाहचे फोटो पोस्ट करत सर्वांना आनंदाची बातमी दिली होती.

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या मोहसिनने पत्नीसोबतच रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. पर्वतरांगा आणि दऱ्याखोऱ्यांच्या नैसर्गिक ठिकाणी हे दोघं फिरायला गेले आहेत. मोहसिन हा काश्मिरमधील बिझनेसमन आहे. त्याचसोबत तो मॉडेलसुद्धा आहे.

मोहसिनने 2016 मध्ये उर्मिला मातोंडकरशी लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 2024 मध्ये मोहसिन आणि उर्मिला विभक्त झाले होते. उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर होतं. घटस्फोटापूर्वी बऱ्याच काळापासून या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या होत्या.

मोहसिनची दुसरी पत्नी निधा ही जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर इथली आहे. निधाबद्दल सोशल मीडियावर फारशी माहिती उपलब्ध नाही. तिचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट्ससुद्धा प्रायव्हेट आहेत. मोहसिन मूळचा काश्मीरचा असून त्याने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली.

मोहसिन 2007 मध्ये 'मिस्टर इंडिया' या स्पर्धेत उपविजेता ठरला होता. त्याने चित्रपटांमध्येही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही. त्यानंतर मोहसिन बिझनेसकडे वळला. सध्या तो काश्मिरी भरतकाम व्यवसायात नाव कमावत आहे.