
नेहा कक्करनं पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगसोबत नुकतीच लग्नगाठ बांधली. या लग्नाची झलक सोशल मीडियावर बरेच दिवस दिसत आहे.

या लग्नाला अभिनेत्री उर्वशी रौटेलानंही हजेरी लावली.

उर्वशीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांना तिच्या डान्सची झलक दिली आहे.

तिनं नेहासोबतचाही एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात उर्वशी नेहाला मिठी मारण्यासाठी जाते मात्र मिठी मारू शकत नाही.

नेहाचा लग्नाचा लेहंगा खूप वजनदार असल्यानं नेहा उठू शकली नाही, मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.