2 तास 22 मिनिटांचा चित्रपट, ‘धुरंधर 2’पेक्षा कित्येक पटींनी अधिक कमावला नफा; ओटीटीवर होतोय ट्रेंड
या चित्रपटाने थिएटरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'च्या तुलनेत या चित्रपटाने अधिक नफा कमावला आहे. मोजक्या बजेटमध्ये बनूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती.

ओटीटीवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नुकताच जिओ हॉटस्टार एक चित्रपट स्ट्रीम झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. 2 तास 22 मिनिटांचा हा चित्रपट ओटीटीवर लगेच ट्रेंडिंग यादीत पोहोचला आहे.

हा चित्रपट याच वर्ष थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मूळ मल्याळम भाषेतील या चित्रपटाने आपल्या दमदार कथानकामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली होती. प्रेक्षक आणि समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती.

या चित्रपटाचं नाव 'वाझा 2' असून जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो नुकताच स्ट्रीम होत आहे. ओटीटीवर येताच या चित्रपटाने कमाल केली आहे. हॉटस्टारवर हा कॉमेडी ड्रामा आता पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. 'वाझा 2' हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वाझा'चा सीक्वेल आहे.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नफा कमावण्याच्या बाबतीत रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' या ब्लॉकबस्टर चित्रपटालाही मागे टाकलं आहे. 'वाझा 2'ने बजेटच्या तुलनेत तब्बल 700 टक्क्यांहून अधिक व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला IMDb वर दहापैकी 8.2 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे.

या चित्रपटाने फक्त 20 दिवसांत जगभरात 200 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवत सर्वांनाच चकीत केलं होतं. या चित्रपटाचं बजेट फक्त दहा कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. विपिन दास यांनी लिहिलेल्या कथेचा या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा आहे. हसीर, अॅलन, अजिन आणि विनायक या चार मित्रांभोवती याची कथा फिरते.