15 वर्षे अन् 232 दिवसांच्या वयात वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी बिहार संघाचे नेतृत्व करत वैभव सूर्यवंशीने जागतिक क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. फलंदाजीसोबतच नेतृत्वगुणांची छाप पाडणारा हा युवा खेळाडू भारतीय क्रिकेटचे नवे आशास्थान ठरत आहे!

| Updated on: Nov 14, 2026 | 12:58 PM
1 / 5
 जगातील सर्वात तरुण टी-20 कर्णधार: वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या 15 वर्षे आणि 232 दिवसांत पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा विश्वविक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.

जगातील सर्वात तरुण टी-20 कर्णधार: वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या 15 वर्षे आणि 232 दिवसांत पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा विश्वविक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.

2 / 5

सौराष्ट्रविरुद्ध मैदानात उतरला: सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत वैभव बिहार संघाचे नेतृत्व करत आहे. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

3 / 5

फलंदाजीतही दाखवली चमक: सौराष्ट्रविरुद्ध वैभवने 12 चेंडूंमध्ये 18 धावा केल्या. 150 च्या स्ट्राइक रेटने खेळताना त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.

4 / 5

मोडला युवा कर्णधाराचा विक्रम: वैभवने क्रोएशियाच्या जॅक वुकुसिकचा विक्रम मोडला. वुकुसिकने वयाच्या 17 वर्षे आणि 311 दिवसांत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व केले होते.

5 / 5

कमी वयात अनेक विक्रम नावावर: वैभवने यापूर्वी सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. तसेच IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक ठोकून इतिहास घडवला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us