Vaibhav Suryavanshi: सूर्यवंशी कसोटीतही धमाका करणार? कुणाचा दावा, टेस्ट सीरीजमध्ये भारताचे वैभव दिसणार?
Vaibhav Suryavanshi Test Team: वैभव सूर्यवंशी सातत्याने गोलंदाजाचे मापं काढत आहे. त्याने काही दिग्गज गोलंदाजाची हावा काढली आहे. त्याला भारतीय संघात घ्यावे अशी सातत्याने मागणी करण्यात येत आहे. केवळ एकदिवसीय संघातच नाही तर कसोटी संघातही त्याला संधी देण्याची मागणी आहे.

Vaibhav Suryavanshi Test Team: वैभव सूर्यवंशी सातत्याने दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने आयपीएलच नाही तर 19 वर्षांखालील संघातही छाप सोडली आहे. आता त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.

अवघ्या 15 वर्षाच्या या खेळाडूचा धक्का अनेक दिग्गजांनी घेतला आहे. त्याला बाद केल्याचा बिभित्स आनंदही काही ज्येष्ठ खेळाडू घेत आहे. तर ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू त्याच्या फलंदाजीच्या शैलीने घायाळ झाले आहे. त्याला लवकर जेष्ठांच्या संघात खेळण्याची मागणी करण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार एरॉन फिंच यांनी वैभव सूर्यवंशी हा टेस्ट क्रिकेटमध्ये कमाल दाखवू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. त्याने वैभव सूर्यवंशीची तुलना ऋषभ पंत या दिग्गज खेळाडूशी केली आहे. त्याच्या मते सूर्यवंशी एकदिवसीय सामन्यासह कसोटीतही मोठी कामगिरी करू शकतो.

एरोन फिंच याच्या मते टेस्ट क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी कसोटीत कमाल दाखवू शकतो. पण वैभवला रेड बॉल क्रिकेटमध्ये सलामीला नाही तर पाचव्या स्थानावर धमाल खेळू शकतो, असा दावा फिंच यांनी केला आहे. त्यामुळे वैभवच्या करियरला भरारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वैभव सूर्यवंशी T20 मध्ये नवीन चेंडूवरही धमाल फलंदाजी केली आहे. जर तो टेस्ट क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या फॉर्ममध्ये खेळला तर तो काय कमाल करू शकतो असे फिंच यांना वाटते. त्यांच्या मते वैभवला कसोटी मालिकेत पहिल्या नाही तर पाचव्या क्रमांकावर खेळायला पाठवायला हवे.

वैभव सूर्यवंशी हा IPL 2026 मध्ये कमाल करत आहे. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी चांगली जोमदार खेळी केली आहे. तो ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत टॉप-5 मध्ये आहे. या हंगामात त्याने 400 हून अधिक धावा केल्या आहेत. आयपीएलनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे, त्या संघात त्याला संधी मिळू शकते.