
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. बिग बॉस मराठीचा 57 वा दिवस सुरू असून आजचा भाग खूपच विशेष आहे. आज 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची टीम बिग बॉसच्या घरात जाणार आहे.

स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक सराफ हे तिन्ही कलाकार बिग बॉसच्या घरात जाणार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा उसगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यात डान्सची जुगलबंदी रंगणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. निलेश साबळे म्हणतोय, "सुप्रिया ताई तुमचं गाणं वाजेल तेव्हा वर्षा ताईंनी परफॉर्म करायचं. त्यानंतर सुप्रिया ताई आणि वर्षा ताई 'घे पाऊल पुढे जरा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत."

नंतर "वर्षा ताईंचं गाणं वाजेल तेव्हा सुप्रिया ताई डान्स करणार", असं निलेश साबळे म्हणतो. त्यानंतर "मी आले", या गाण्यावर सुप्रिया पिळगांवकर थिरकताना दिसतात.

या एपिसोडमध्ये निलेश साबळे अशोक सराफ यांनी प्रश्न विचारतो, "तुमच्या घरी 'बिग बॉस कोण?" याचं उत्तर देत मामा म्हणतात, "निवेदिता ताई... माझ्या मर्मावर बोट ठेवलंस."