Vastu Tips | तणाव दूर करणारा पारिजात, जाणून घ्या ओंजळीभर प्राजक्ताच्या फुलांची कमाल

| Updated on: Jan 24, 2022 | 6:16 PM

प्राजक्ताच्या फुलांना पारिजात असेही म्हणतात. सामान्यतः लोक पूजेसाठी प्राजक्ताच्या फुलांचा वापर करतात. पारिजात या झाडाला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे.

1 / 5
प्राजक्ताच्या फुलांना पारिजात असेही म्हणतात.  सामान्यतः लोक पूजेसाठी प्राजक्ताच्या फुलांचा वापर करतात. पारिजात या झाडाला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया पारिजात रोप लावण्याचे फायदे.

2 / 5
तुम्ही घरी पारिजात रोप लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार जिथे हे झाड असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. पारिजातामुळे घरात सुख-समृद्धी येते. ही वनस्पती वास्तुदोष दूर करते.

3 / 5
वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती नकारात्मकता दूर करते. जिथे ही वनस्पती आहे तिथे सकारात्मक उर्जेचा संचार होतो. पारिजात फुलांच्या सुगंधाने मन शांत होते आणि मानसिक तणाव दूर होतो.

4 / 5
प्राजक्ताची फुले रात्रीच उमलतात. त्याची फुले सकाळी कोमेजतात. अंगणात ही फुले जिथे उमलतील तिथे सदैव सुख-शांती नांदते. याच्या फुलाचा सुगंध जीवनातील तणाव दूर करतो. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.

5 / 5
 पौराणिक कथेनुसार पारिजात वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली. देवी लक्ष्मीला पारिजातची फुले अर्पण करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सदैव वास करते.