
मुंबईमध्ये कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावरून जैन समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. मात्र, ज्योतिषीशास्त्रानुसार, कबुतरांना चणे खायला देण्याची अनेक फायदे आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार, कबूतरांचा संबंध ग्रहांशी आहे. असे मानले जाते की, कबुतरांना खाऊ घातल्याने राहू आणि केतूचा तुमच्यावर आर्शिवाद राहतो. कबुतरांचा शुक्र ग्रहाशी देखील संबंध आहे.

कबुतरांना खायला घातल्याने घरात आनंद कायम राहतो. कबुतरांना खायला घालणे ही देवाची सेवा मानली जाते. यामुळे अनेक लोक कबुतरांना खायला घालतात.

कबुतरांना चणे खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, कबुतरांना चणे दिल्याने दिल्याने आपल्या पूर्वजांचे पाप कमी होते आणि त्यांना हे अन्न दिल्यासारखे आहे.

कबुतरांना खायला घातल्याने सर्व देवांचा आर्शिवाद मिळतो, असे मानले जाते. (टीप येथे दिलेली माहिती ही ज्योतिषशास्त्रानुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही)