Vastu Tips Today : या चार वस्तू म्हणजे घरावर संकट, डेकोरेशनच्या हट्टापाई कधीच करू नका ही चूक!
सध्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा सजावटीसाठी कॅक्टससारखी काटेरी झाडे ठेवण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार अशी झाडे नात्यांमधील कटुता आणि वादाचे प्रतीक मानली जातात.

घराच्या भिंतींवर लावलेली चित्रे घरातील वातावरणावर परिणाम करतात, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे युद्ध, हिंसाचार, विनाश आणि दुःख दर्शवणारी चित्रे घरात लावणे टाळावे. त्याऐवजी निसर्ग, फुले, हिरवीगार झाडे आणि सुंदर निसर्गदृश्यांची चित्रे लावण्याचा सल्ला दिला जातो.
वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे प्रगती आणि वेळेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात बंद पडलेले किंवा खराब झालेले घड्याळ ठेवणे अशुभ समजले जाते. तसेच नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर जुन्या वर्षाचे कॅलेंडर काढून टाकावे, अशी मान्यता आहे.
घरात सजावटीसाठी आरसे आणि काचेच्या वस्तू वापरल्या जातात. मात्र, तुटलेला आरसा किंवा तडा गेलेल्या काचेच्या वस्तू घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. अशा वस्तूंमुळे नकारात्मकता आणि मानसिक तणाव वाढू शकतो, अशी समजूत आहे.
सध्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा सजावटीसाठी कॅक्टससारखी काटेरी झाडे ठेवण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार अशी झाडे नात्यांमधील कटुता आणि वादाचे प्रतीक मानली जातात. त्याऐवजी तुळस, मनी प्लांट, बांबू आणि हिरवीगार शोभेची झाडे लावण्याचा सल्ला दिला जातो.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.