
'झी मराठी' वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गोव्यात झालेल्या धमाकेदार लग्नसोहळ्यानंतर स्वानंदी- समर आणि अधिरा- रोहनचा पहिलावहिला सण साजरा होणार आहे. परंतु अंशुमनने रोहनचा अपघाताची करण्याची सुपारी दिली आहे.

यादरम्यान स्वानंदी अंशुमनला सडेतोड उत्तर देताना दिसली आहे. "तुझा वाट तर मी लावणारच आहे" अशी धमकी देणाऱ्याला स्वानंदी म्हणते, "एकदा जिंकला म्हणजे तू प्रत्येकवेळी कसा जिंकशील? असं नाही होत." त्यावर "मी कधी हरत नाही", असं अंशुमन म्हणताच "मी कधीही हार मानत नाही", असं प्रत्युत्तर स्वानंदी देते.

तू काहीच करू शकत नाही, कारण ते तुझ्या हातात नाही, असं म्हणत स्वानंदी अंशुमनला डिवचते. ना मी माझा संसार मोडू देणार, ना अधिराचा.. असं आत्मविश्वासाने ती अंशुमनला उत्तर देते. प्रेक्षकांना या दोघांमधील हा संवाद खूपच आवडला आहे. या प्रोमोवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

'एक नंबर स्वानंदी, याला असंच पाहिजे', असं एकाने लिहिलंय. तर 'स्वानंदी विरुद्ध अंशुमन.. हा या एपिसोडचा सर्वोत्तम भाग होता, स्वानंदी मस्त उत्तर दिलं', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'तिथल्या तिथेच दोन कानाखाली ओढायचे आणि उडवून द्यायचं,' असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

'वेल डन स्वानंदी.. अंशुमनचा अहंकार चिरडण्याची वेळ आली आहे. या सीनमध्ये अंशुमन आणि स्वानंदी या दोघांनी उत्तम अभिनय केला आहे', असं मत नेटकऱ्यांनी मांडलं आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.