Veg Biryani Recipe : बिर्याणी खाण्याची इच्छा झालीय? मग घरच्या घरी बनवा लज्जतदार व्हेज बिर्याणी; रेसिपी एकदा पाहाच…

बिर्याणी खाण्याची इच्छा झालीय? मग आता हॉटेलमधून ऑर्डर करण्याची गरज नाही! खास बिर्याणी मसाला, केशर, तळलेला कांदा आणि काजू यामुळे बिर्याणीला मिळेल अप्रतिम चव. जाणून घ्या हॉटेलस्टाइल व्हेज बिर्याणी बनवण्याची सोपी रेसिपी!

| Updated on: Nov 12, 2026 | 3:18 PM
1 / 6
रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : १/२ किलो बासमती तांदूळ, २ मोठे चमचे तेल, १०~१२ काजू, सुकवलेला कांदा, १ चमचा जिरं, १ बारीक चिरलेला कांदा, १/२ कप दही, १ चमचा धनेपूड, १ चमचा लाल तिखट, २ हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, २ चमचे एवरेस्ट बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ, १ मोठा सोलून चिरलेला बटाटा, १/२ कप फ्लॉवरचे तुरे, ५~६ श्रावणघेवड्याच्या शेंगा चिरून, १ गाजर चिरून, १/४ कप ग्रीन पीज, जरुरीनुसार पाणी, जरुरीनुसार गरम पाणी, १०~१२ एवरेस्ट केशराच्या काड्या, जरुरीनुसार पाणी, चवीनुसार मीठ, १ तमालपत्र, ५~६ काळी मिरी, ३~४ लवंगा, १ चक्रीफूल, १ दालचिनीचा तुकडा, २ हिरवी वेलची, १ मसाला वेलची, १ चमचा साजूक तूप, १०० ग्रॅम पनीरचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं, २~३ चमचे साजूक तूप

2 / 6

तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुऊन घ्या आणि पुरेशा पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवा. कढईत तेल गरम करून काजू सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. ते एका ताटात काढून ठेवा. त्याच तेलात उभा चिरलेला कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.

3 / 6

उरलेल्या तेलात जिरे घालून तडतडू द्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. आता त्यात दही, धणेपूड, लाल तिखट, हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यात एव्हरेस्ट बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून २ ते ३ मिनिटे चांगले परतून घ्या. त्यानंतर बटाटा, फ्लॉवर, फरसबी, गाजर आणि मटार घालून सर्व भाज्या मसाल्यात छान मिक्स करा. भाज्या कढईला चिकटू नयेत म्हणून थोडे पाणी घाला.

4 / 6

कढईवर झाकण ठेवून मध्यम आचेवर भाज्या १० मिनिटे वाफवून घ्या. केशर गरम पाण्यात १५ ते २० मिनिटे भिजवून केशराचे पाणी तयार करा. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ, तमालपत्र, काळी मिरी, लवंगा, चक्रफूल, दालचिनी, हिरवी वेलची, काळी वेलची आणि तूप घाला. भिजवलेल्या तांदळातील पाणी पूर्णपणे काढून टाका आणि तांदूळ उकळत्या पाण्यात घाला.

5 / 6

मध्यम आचेवर साधारण ७ ते ८ मिनिटे तांदूळ शिजवून घ्या. भाज्यांच्या मसाल्यात पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा. तांदूळ शिजवणाऱ्या गॅसची आच बंद करा. शिजवलेल्या तांदळातील पाणी काढून टाका. त्यानंतर भाज्यांच्या मसाल्यावर शिजलेल्या तांदळाचा एक थर पसरवा. तांदूळ समान पसरवून त्यावर तांदूळ शिजवलेल्या पाण्यातील १ ते २ पळी पाणी घाला.

6 / 6

त्यावर केशराचे पाणी, कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि थोडे तूप घाला. भांड्यावर झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर २० मिनिटे बिर्याणी वाफवून घ्या. २० मिनिटांनंतर गॅस बंद करा. तुमची स्वादिष्ट व्हेज बिर्याणी तयार आहे. सर्व्ह करताना वरून तळलेला कांदा आणि सोनेरी तळलेले काजू घालून सजवा. गरमागरम व्हेज बिर्याणी रायता किंवा सॅलडसोबत सर्व्ह करा!

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us