
बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल हा त्याच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग देखील केली आहे. बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना हा चित्रपट दिसत आहे.

विकी काैशल आणि सारा अली खान यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडल्याचे दिसत आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विकी काैशल याने रणबीर कपूर याचे गुपित उघड केले आहे.

मुलाखतीमध्ये बोलताना विकी काैशल म्हणाला की, जेव्हा रणबीर कपूर हा त्याच्या कोणत्याही भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो, तेव्हा तो सेटवर दाखवू देत नाही.

पुढे विकी काैशल म्हणाला की, रणबीर माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीरची खास गोष्ट म्हणजे तो एक व्यक्ती आणि अभिनेता म्हणून सुरक्षित आहे.

2018 मध्ये संजय दत्तच्या बायोपिक संजूमध्ये रणबीर कपूर आणि विकी काैशल यांनी सोबत काम केले आहे. विकी काैशल आणि सारा अली खान हे त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत होते.