कान टोचले, वजन वाढवलं, घोडदौड-काठी चालवणं शिकला.. ‘छावा’साठी विकी कौशलची जबरदस्त तयारी

अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'छावा' हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

| Updated on: Feb 13, 2025 | 1:15 PM
1 / 6
भूमिका कोणतीही असो, अभिनेता विकी कौशल त्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. 'छावा' या चित्रपटातून तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेसाठी त्याने किती तयारी केली, याचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 6
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकीने 25 किलो वजन वाढवलंय. वजनाच्या काट्याचाही फोटो त्याने पोस्ट केला आहे. तर साहसीदृश्यांसाठी त्याने विशेष प्रशिक्षण घेतलंय.

3 / 6
भूमिकेतील प्रत्येक बारकावे लक्षात घेऊन तो विविध कलासुद्धा शिकला. विकीने काठी चालवण्याचंही प्रशिक्षण घेतलं असून इन्स्टाग्रामवर त्याने काठी चालवतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

4 / 6
त्याचसोबत तो घोडदौडसुद्धा शिकला आहे. चित्रपटाच्या सेटवर घोडदौडीचा सराव करतानाही व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. भूमिकेप्रती विकीचं समर्पण पाहून नेटकरीसुद्धा त्याचं कौतुक करत आहेत.

5 / 6
विकीने या भूमिकेसाठी त्याचे कानसुद्धा टोचले आहेत. त्याचप्रमाणे विशिष्ट शरीरयष्टीसाठी खूप मेहनत घेतली आहे. विकी पहिल्यांदाच एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

6 / 6
लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.