
विजय हजारे करंडकातील अंतिम सामना आज (14 मार्च) खेळवण्यात येणार आहे. जेतेपेदासाठी मुंबई विरुद्ध युपी आमनेसामने असणार आहेत. युपीने तब्बल 16 वर्षांनंतर अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या अंतिम सामन्यात 5 स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

पृथ्वी शॉने विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने या हंगामात एकूण 7 सामन्यांमध्ये 4 शतकांसह 754 धावा कुटल्या आहेत. यामुळे पृथ्वीकडून अंतिम सामन्यात मुंबईच्या समर्थकांना मोठी खेळी अपेक्षित असणार आहे.

शिवम दुबे अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे शिवमवर बॅटिंगसह बोलिंग अशा दोन्ही आघाड्यांची जबाबदारी असणार आहे.

धवल कुलकर्णी अनुभवी गोलंदाज आहे. धवलने आतापर्यंत या हंगामातील 5 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे ही अशीच कामगिरी अंतिम सामन्यात कायम ठेवण्याचा मानस धवलचा असेल.

उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या प्रियम गर्गने या हंगामात 2 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे. त्यामुळे युपीला प्रियमकडून अशाच शतकी खेळीची अपेक्षा असणार आहे.

युपीच्या शिवम मावीला या स्पर्धेत आतापर्यंत विशेष काही करता आलेले नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत शेवट गोड करण्याचा प्रयत्न शिवमचा असेल.