राजकारणात उलटफेर; माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन पुन्हा कमबॅक करणार? CM विजय यांना धक्का देणार?
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर होणार आहे. माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन पुन्हा कमबॅक करणार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींकडे पुन्हा एकदा लक्ष लागलं आहे. अनेकांच्या नजरा तामिळनाडूतील कोलाथूर विधानसभेच्या जागेवर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षातील आमदार व्हीएस बाबू यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.
आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. आता या पोटनिवडणुकीत कोलाथूरच्या मैदानात डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन उतरणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. पोटनिवडणुकीमुळे स्टॅलिन यांच्या कमबॅककडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
व्हीए बाबू यांनी विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा पराभव केला होता. एमके स्टॅलिन हे 2011 सालापासून कोथालूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. परंतु याच मतदारसंघात एम के स्टॅलिन यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे स्टॅलिन यांच्या अडचणीत वाढ झाली.
तामिळनाडूमध्ये डीएमके यांच्या पक्षाला पराभवाला देखील सामोरे जावं लागलं. विजय यांच्या पक्षाने डीएमके यांच्या पक्षाला सत्तेतून खाली खेचलं.
व्हीएस बाबू यांच्या निधनानंतर रिक्त होणाऱ्या पोटनिवडणुकीत डीएमके पक्षाला पुन्हा जागा जिंकण्याची संधी आहे. डीएमके पक्षातील काही नेत्यांनी एमके स्टॅलिन यांना पुन्हा निवडणुकीत उतरावं, अशी विनंती देखील केली आहे. त्यामुळे एमके स्टॅलिन मुख्यमंत्री विजय यांना धक्का देणार का, याकडे लक्ष लागलं आहे.