1 तास 40 मिनिटांची थरकाप उडवणारी खरी कहाणी, मुलीच्या आयुष्यातचे ते 7 दिवस अन् 13 लोकांना शिक्षा
तुम्हाला हॉरर सिनेमा पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा सिनेमा नक्की पाहा. कारण सिनेमा पाहताना तुम्हाचा थरकाप उडेल अशी दृश्य दाखवण्यात आली आहेत.

जेव्हा एखादी कहाणी खऱ्या जीवनातून घेतली जाते, तेव्हा लोक ती पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. चित्रपटात जेव्हा एखाद्या unsolved केसचे पैलू उघड होतात, पीडित कुटुंबाची वेदना समोर येते आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष दाखवला जातो तेव्हा प्रत्येकाला स्वतःला त्या दुःखाशी जोडल्यासारखे वाटू लागते. याच कारणामुळे जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा सर्वत्र याच सिनेमाची चर्चा होती. लोकांनी हा फक्त एक हॉरर चित्रपट म्हणून नाही, तर एक अत्यंत संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारी खरी घटना म्हणून अनुभव घेतला.

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो २०२४ मध्ये रिलीज झाला होता. या हॉरर-थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन एंगी उम्बारा यांनी केले होते आणि धीरज कालवानी यांच्या सहकार्याने बनवला गेला होता. या चित्रपटात नायला डी. पूर्णामा, गिसेल्मा फिर्मनस्याह, लिडिया कांदौ, प्रिट टिमोथी, डेलिया हुसेन, यूसुफ महर्दिका आणि फहद हैद्रा यांसारखे कलाकार दिसले होते. चित्रपटाची कहाणी आणि सर्व कलाकारांच्या कामाची सर्वत्र भरभरून प्रशंसा झाली. आजही हा चित्रपट पाहताना लोकांचे मन थरथरते. खऱ्या कहाणीवर आधारित या चित्रपटाचे नाव ‘वीना के वो सात दिन’ आहे.

या चित्रपटाची संपूर्ण कहाणी वीणा आणि तिच्या मित्राचा अचानक झालेल्या रहस्यमय मृत्यूभोवती विणली गेली आहे. सुरुवातीला हा एक रस्त्यावरील अपघात वाटतो, पण जसजसा वेळ जातो तसतसे काही पुरावे समोर येतात जे या अपघाताला एक मोठ्या षड्यंत्राकडे वळवतात. कहाणीत नवे वळण तेव्हा येते जेव्हा वीणाचा आत्मा आपल्या सर्वात चांगल्या मित्राच्या शरीरात शिरून आपल्या कुटुंबाला संपूर्ण सत्य सांगण्याचा प्रयत्न करते. १२ लोकांनी वीणावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर क्रूरपणे तिला आणि तिच्या मित्राला मारून टाकले. त्यानंतर त्यांना एक-एक करून शिक्षा मिळते.

प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. रिलीज होण्याच्या पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये प्रचंड गर्दी उसळली आणि पाहता पाहता तो वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला. त्याच्या थिएटर शोमध्ये जवळपास ५८ लाख तिकिटे विकली गेली, जी स्वतःच एक मोठा विक्रम आहे. जरी अधिकृतरित्या त्याचे बजेट उघड केले नसले तरी, तिकिटांच्या भरघोस विक्रीवरून अंदाज लावला जातो की त्याने भारतात सुमारे १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली, तर IMDb वर त्याला ५.४ रेटिंग मिळाली.

थिएटरमध्ये गदारोळ माजवल्यांनंतर या चित्रपटाने OTT जगात पाऊल टाकले आणि तिथेही खळबळ माजवली. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसोबत भारतीय प्रेक्षकांनीही या चित्रपटाला खूप पसंती दिली. बातम्यांनुसार ऑगस्ट २०२५ मध्ये त्याचे OTT प्रीमियर झाले होते. हा चित्रपट JioHotstar या OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला होता, जो हिंदी भाषेतही पाहता येऊ शकतो. आपल्या खऱ्या आणि भावनिक करणाऱ्या कहाणीमुळे आणि उत्कृष्ट हॉरर सीन्समुळे हा चित्रपट आजही सिनेमा प्रेमींमध्ये खूप पाहिला जातो, ज्यामुळे तो एक उत्कृष्ट हॉरर चित्रपट बनतो.