रब ने बना दी जोडी! 3.8 फुटांची नवरी आणि 4.2 फुटांचा नवरदेव, क्यूट जोडीचे फोटो समोर

अकोल्याच्या प्रतीक धानुका आणि मध्य प्रदेशच्या रेणुका यांचा विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ४.२ फूट उंचीचा नवरदेव आणि ३.८ फूट उंचीची नवरी, दोघांचेही उच्च शिक्षण आणि करिअर पाहून ही जोडी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

| Updated on: Feb 17, 2026 | 12:40 PM
1 / 8
लग्न म्हणजे दोन जीवांचा सुंदर संगम आणि नियतीने जुळवलेला एक अनोखा बंध. कधी कधी काही जोड्या अशा जुळतात की, त्या पाहताच सर्वांच्या ओठांवर एकच शब्द येतो - रब ने बना दी जोडी!

लग्न म्हणजे दोन जीवांचा सुंदर संगम आणि नियतीने जुळवलेला एक अनोखा बंध. कधी कधी काही जोड्या अशा जुळतात की, त्या पाहताच सर्वांच्या ओठांवर एकच शब्द येतो - रब ने बना दी जोडी!

2 / 8

असाच एक आगळावेगळा आणि मनमोहक विवाह सोहळा सध्या अकोला शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. अकोला येथील रहिवासी प्रतीक धानुका आणि मध्य प्रदेशातील सिरोज येथील रेणुका यांचा शुभविवाह नुकताच सिरोज येथे अत्यंत उत्साहात पार पडला.

3 / 8

या विवाहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे नवरदेव प्रतीक यांची उंची ४.२ फूट आहे, तर नवरी रेणुका यांची उंची ३.८ फूट आहे. या क्युट जोडीने केवळ वऱ्हाडीच नव्हे, तर संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.

4 / 8

केवळ उंचीच नाही, तर या दोघांचे शिक्षण आणि करिअरही तितकेच प्रभावी आहे. नवरदेव प्रतीक धानुका हे पुणे येथे आयसीआयसीआय (ICICI) बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

5 / 8

तर नवरी रेणुका या सिरोज येथील एका शाळेत लायब्ररीयन म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. दोघांचीही जिद्द आणि कर्तृत्व पाहून उपस्थितांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.

6 / 8

मध्य प्रदेशात विवाह सोहळा आटोपल्यानंतर, आज अकोला शहरातील खंडेलवाल लॉन्स येथे या नवदांपत्याचा भव्य रिसेप्शन (स्नेहभोजन) सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनी मोठी गर्दी केली होती.

7 / 8

स्टेजवर ही जोडी उभी असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावरही हसू फुलले. अनेकांनी या जोडीसोबत सेल्फी घेण्याचा आनंद लुटला. तसेच त्यांच्या वैवाहिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

8 / 8

दरम्यान सोशल मीडिया आणि स्थानिक परिसरात या रब ने बना दी जोडीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. उंचीपेक्षा मनाची ओढ महत्त्वाची असते, हेच या जोडीने सिद्ध केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us