
वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार आणि 11 हजार धावा करणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्माला टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल असा कदाचितच कोणी विचार केला असेल?. ते सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर काही महिन्यात. (Photo: Getty Images)

भारतीय क्रिकेटमधील मोठे प्लेयर असलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्माची सध्याची स्थिती अशीच आहे. T20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या दोन्ही फलंदाजांच वनडेमधील स्थानही धोक्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया टूर त्यांच्यासाठी शेवटचा दौरा ठरु शकतो. (Photo: Getty Images)

दोन्ही फलंदाज वर्ल्ड कप 2027 साठी टीम मॅनेजमेंटच्या प्लानचा हिस्सा नाहीयत असा एका वर्तमानपत्राच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्यांना वनडे क्रिकेटमधून सुद्धा निवृत्ती स्वीकारावी लागू शकते. दोघांना पुढे खेळायचं असेल, तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये स्वत:ला सिद्ध करावं लागेल. (Photo: PTI)

न्यूज एजेंसी PTI च्या रिपोर्टमध्ये BCCI सुत्रांच्या हवाल्याने म्हटलय की, सध्या बोर्ड या दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीची घाई करणार नाही. ऑस्ट्रेलिया सीरीजआधी या दोघांनी 3 वनडे सामने खेळून आपला फॉर्म परत मिळवावा अशी सुद्धा BCCI मध्ये चर्चा आहे. . (Photo: Getty Images)

ऑस्ट्रेलियामध्ये 19 ऑक्टोंबर ते 25 ऑक्टोंबर दरम्यान वनडे सीरीज होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलिया ए आणि इंडिया ए मध्ये 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान वनडे सीरीज होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी फॉर्म मिळवण्यासाठी रोहित आणि विराटने या सीरीजमधले किमान दोन सामने खेळावेत अशी सुद्धा चर्चा आहे. (Photo: PTI)