Virat Kohli : क्रिकेट मॅचदरम्यान विराट खातो खास चॉकलेट, एका पॅकच्या किमतीत अख्खं…

Virat Kohli Chocolate During Match : भारताचा नामवंत खेळाडू असलेला विराट कोहली केवळ त्याच्या उत्तम खेळीसाठीच नाही तर त्याच्या उत्कृष्ट फिटनेससाठी देखील ओळखला जातो. क्रिकेट सामन्यादरम्यान कोहली अनेकदा चॉकलेट खाताना दिसतो. त्याचं चॉकलेट खूप खास आहे, त्याची किंमत ऐकाल तर...

| Updated on: Jun 17, 2025 | 9:34 AM
1 / 9
मॅचदरम्यान विराट अनेकदा एक चॉकलेट खातान दिसतो, ते नेमकं कोणतं चॉकलेट आहे, त्याची खासियत काय हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

मॅचदरम्यान विराट अनेकदा एक चॉकलेट खातान दिसतो, ते नेमकं कोणतं चॉकलेट आहे, त्याची खासियत काय हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

2 / 9

विराट कोहली जे चॉकलेट खातो ते जेली स्वरूपात असते. त्याला याचा खूप फायदा होतो. कोहली जे चॉकलेट खातो, ती कंपनी लंडनची आहे.

3 / 9

हे चॉकलेट सहा चॉकलेटच्या पॅकमध्ये येते आणि भारतात त्याची किंमत तब्बल 5 हजार रुपये आहे. एकदा आयपीएल सामन्यादरम्यान विराट हे चॉकलेट खाताना दिसला होता.

4 / 9

त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. कोहली सामन्यादरम्यान काय खातो, ते नक्की काय आहे, असे अनेक प्रश्न लोकांनी विचारले होते.

5 / 9

या चॉकलेटची खासियत म्हणजे त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅफिन असते. दीर्घकाळ काम केल्यानंतर ते चॉकलेट शरीराचा थकवा दूर करतं.

6 / 9

जेव्हा जेव्हा कोहलीला सामन्यादरम्यान थकवा जाणवतो तेव्हा तो हे चॉकलेट खातो. जलद रिकव्हरीसाठी विराट याचा वापर करतो.

7 / 9

रिपोर्ट्सनुसार, या चॉकलेटचे वजन 100 ग्रॅम आहे आणि ते ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर उपलब्ध आहे.

8 / 9

हे फक्त एक एनर्जेटिक चॉकलेट आहे जे शरीराला ऊर्जा देतं, खेळण्यासाठी ताकद देतं. कोहलीचा माजी सहकारी एबी डिव्हिलियर्सनेही सांगितले होते की कोहलीला डार्क चॉकलेट आवडतं.

9 / 9

विराटच्या या चॉकलेटची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us