
विराट कोहलीचे वडील तो रणजी क्रिकेट खेळत असताना वारले. त्यानंतर विराटने एक-एक विक्रम आपल्या मोडत आता सचिनच्या विक्रमाची बरोबरी केलीये. कोहली त्याचा प्रत्येक वेळेचा उपयोग करून घेतो. विराट जिम, कुटुंब आणि सरावाला प्रायोरिटी देतो.

विराट आणि अनुष्का यांनी एक मुलगी असून वामिका असं तिचं नाव आहे. दोघांनीही तिचे फोटो व्हायरल केले नाहीत. मीडियालासुद्धा फोटो व्हायरल करू नका असं सांगितलं आहे.

विराट फोनवर त्याच्या आईसह आणि पत्नी यांच्याशी कॉलवर अधिक बोलतो. पण एक आणखी एक व्यक्ती असून विराटच्या जीवनात या व्यक्तीला मोठं स्थान आहे.

विराट ज्या व्यक्तीसोबत फोनवर बोलतो ते म्हणजे त्याचे बालपणीचे प्रशिक्षक आहेत. राजकुमार शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे.

1998 मध्ये त्यांनी पश्चिम दिल्लीत क्रिकेट अकादमी सुरू केलेली. विराट तिथेच शिकायला जात होता, आयपीएलमध्ये विराटने त्यांच्या पायाला स्पर्श केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.