Virat Kohli वर्ल्ड कपनंतर संन्यास घेणार? खूप जवळच्या कोचने केला सर्वात मोठा खुलासा; सस्पेन्स संपवला!
virat kohli retirement: 2027 चा वनडे वर्ल्ड कप विराट कोहलीचा अखेरचा विश्वचषक असेल, पण त्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार का? विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विराटने नेमकं काय सांगितलं, जाणून घ्या.

विराट कोहलीचा लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी मोठा खुलासा केला आहे. 2027 चा वनडे वर्ल्ड कप विराटच्या कारकिर्दीतील शेवटचा वर्ल्ड कप असेल. मात्र, त्यानंतरही तो भारतासाठी क्रिकेट खेळत राहू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
राजकुमार शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, विराट कोहलीने स्वतः त्यांच्याशी संवाद साधताना 2027 चा वर्ल्ड कप हा आपला शेवटचा वर्ल्ड कप असल्याचे सांगितले आहे. मात्र, भारतासाठीचा शेवटचा सामना असेल, असे त्याने म्हटलेले नाही.
वर्ल्ड कप दर 4 वर्षांनी आयोजित केला जातो. त्यामुळे 2027 चा वर्ल्ड कप आपला शेवटचा असेल, असे विराटने सांगितल्याचे राजकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ वर्ल्ड कपनंतर लगेच निवृत्ती घेण्याचा त्याचा विचार नाही.
विराट कोहली सध्या केवळ वनडे क्रिकेट खेळत आहे. त्याने 2024 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून, तर मे 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे 2027 च्या वर्ल्ड कपनंतर त्याच्या वनडे कारकिर्दीबाबत चर्चा सुरू आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत 320 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 58.64 च्या सरासरीने 15,190 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 55 शतकं आणि 80 अर्धशतकं आहेत. त्यामुळे 2027 च्या वर्ल्ड कपनंतरही विराट खेळत राहणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.