आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झालं की..; मराठी अभिनेत्याच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

अभिनेता विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांच्या लग्नाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात या दोघांनी लग्नगाठ बांधली. तर हरिद्वारमध्ये त्यांनी साखरपुडा केला.

| Updated on: Feb 13, 2026 | 10:45 AM
1 / 5
'बिग बॉस मराठी 3'चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विशाल निकम नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली आहे. विशाल आणि अक्षया यांचा लग्नसोहळा विशेष चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी निवडलेलं स्थळ.

'बिग बॉस मराठी 3'चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विशाल निकम नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली आहे. विशाल आणि अक्षया यांचा लग्नसोहळा विशेष चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी निवडलेलं स्थळ.

2 / 5

कुठल्याही हॉल किंवा ओपन ग्राऊंडमध्ये भरभरून पैसे न खर्च करता या दोघांनी उत्तराखंडमधल्या प्रसिद्ध त्रियुगीनारायण मंदिरात लग्न केलं. या मंदिरात लग्न करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. विशाल आणि अक्षयाचंही हेच स्वप्न होतं आणि त्यांनी ते अखेर पूर्ण केलं.

3 / 5

लग्नानंतर त्यांनी उत्तराखंडमधल्या अत्यंत नयनरम्य ठिकाणी खास फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये दोघांच्या मागे बर्फाच्छादित पर्वतांचं सुरेख दृश्य पहायला मिळतंय. विशाल आणि अक्षयाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 5

'दोघांनाही शुभेच्छा, सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा', अशी कमेंट अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने केली. तर 'आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झालं की दोघांच्याही चेहऱ्यावर ते सुख आणि आनंद दिसून येतो,' असं एका युजरने लिहिलं आहे.

5 / 5

त्रियुगीनारायण मंदिर हे शिव-पार्वतीच्या विवाहाचं पवित्र स्थान म्हणून ओळखलं जातं. 'तुमच्या संसाराला शिव-पार्वतीसारखं अखंड प्रेम, समृद्धी आणि आशीर्वाद लाभो,' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या दोघांच्या फोटोंवर दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us