विशाल निकम – अक्षया हिंदळकर यांचा साखरपुडा; अभिनेता म्हणाला ‘देव खरंच माझ्या बाजूने..’

'बिग बॉस मराठी 3'चा विजेता विशाल निकम याने नुकताच मराठी अभिनेत्री अक्षया हिंदळकरशी साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Feb 09, 2026 | 11:32 AM
1 / 5
'बिग बॉस मराठी 3'चा विजेता विशाल निकमने उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये थाटात साखरपुडा केला आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकरशी त्याने साखरपुडा केला असून या सोहळ्याचे फोटो त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

'बिग बॉस मराठी 3'चा विजेता विशाल निकमने उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये थाटात साखरपुडा केला आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकरशी त्याने साखरपुडा केला असून या सोहळ्याचे फोटो त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

2 / 5

'देव खरंच माझ्या बाजूने होता, जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं,' असं कॅप्शन लिहित विशालने हे खास फोटो पोस्ट केले आहेत. साखरपुड्यात अक्षयाने हिरव्या रंगाची काठपदराची साडी नेसली होती, तर आंबा कलरचा कुर्ता, धोती आणि शॉल असा विशालचा लूक होता.

3 / 5

काही दिवसांपूर्वीच विशालने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. अक्षयाला 'अर्धांगिनी' म्हणत त्याने रोमँटिक फोटो पोस्ट केले होते. तर साखरपुड्याच्या आधी दोघांनीही कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात जाऊन देवाचं दर्शनसुद्धा घेतलं होतं.

4 / 5

विशालची होणारी पत्नी अक्षयाने 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 'पीएसआय अर्जुन'मध्येही तिने काम केलं होतं. याशिवाय इतरही काही मालिकांमध्ये तिने मुख्य आणि सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या.

5 / 5

विशाल निकमला 'दख्खनचा राजा ज्योतिबा माझा' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर त्याने बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं. सध्या तो 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत रायाची भूमिका साकारतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us