
किवी हे फळ अनेकांना आवडते. किवी खाल्ल्याने आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते. संत्री खाऊन कंटाळा आला असेल तर किवी हा चांगला पर्याय आहे. 2 किवी खाल्ले तर आपल्याला सुमारे 137 मिलीग्राम व्हिटॅमिन सी देते. किवीमुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

एक कप चिरलेल्या पपईत ८८ मिलीग्राम व्हिटॅमिन सी. तुम्ही म्हणाल कशाला पाहिजे रोज-रोज संत्रे? पपईमध्ये अँटीऑक्सिडेंट आहे जे अनेक रोगांशी लढाई करतं. हे फळ नियमित खायला हवं.

शिमला मिरचीची भाजी जबरदस्त लागते. मध्यम आकाराची शिमला मिरची तुम्हाला 152 ग्रॅम व्हिटॅमिन सी देते. शिमला मिरचीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते .

जी फळे थोडीशी आंबट लागतात ती फळे आपल्याला व्हिटॅमिन सी देतात. मग यात पेरू पण येतो नाही का? मध्यम आकाराचे पेरू 125 ग्रॅम व्हिटॅमिन सी देते. रक्तातील साखरेची पातळी टिकून राहते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते. विशेष म्हणजे पोटाच्या समस्येवर उत्तम आहे पेरू.

अननस हे फळ व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. अननसामध्ये व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम, तांबे आणि थायमिन असते. एक कप चिरलेल्या अननसामध्ये 79 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते.