Vitthal Birdev prediction : राजकीय उलथापालथ, राजाबाबत मोठं भाकीत, 2026 कसं जाणार? विठ्ठल बिरदेवाची भाकणूक

महाराष्ट्रासह पाच राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेतील भाकणूक ऐकण्यासाठी देशभरातून भक्त इथे येतात.

| Updated on: Oct 12, 2025 | 7:34 PM
1 / 7
महाराष्ट्रासह पाच राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. ढोल-कैतळाचा निनाद, खोबरे, लोकर आणि सत्तर टन भंडार्‍याची मुक्त उधळण तसेच  परंपरागत अंजनगावचे फरांडेबाबा खेलोबा वाघमोडे यांच्या भाकणुकीने यात्रेला प्रारंभ झाला.

2 / 7
आज सकाळी मंदिराचे मानकरी, गावकामगार पाटील, कुलकर्णी, मगदूम, जोशी, चौगुले, गावडे, पुजारी यांनी मंदिरातून येऊन फरांडेबाबांना आलिंगन देत भेट घेऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. मानकरी चौगुले यांनी फरांडेबाबांच्या पायामध्ये वाळातोडा घातला यानंतर मानाची तलवार हातात घेऊन फरांडेबाबांनी हेडाम खेळत मंदिरामध्ये प्रवेश केला.

3 / 7
यावेळी  मानाच्या छत्र्या,ढोल-कैताळ,धनगरी ओव्यांनी परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पिवळ्याधमक भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीने संपूर्ण परिसराला सोनेरी चमक आली

4 / 7
विठ्ठल बिरदेवाचं चांगभलच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला, फरांडेबाबांची भाकणूक ऐकण्यासाठी राज्यसह, परराज्यातील भाविक देखील यावेळी मंदिरात आले, भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली.

5 / 7
फरांडेबाबांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार पुढील वर्षी राज्यात पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे, मृग नक्षत्र लागताच पहिल्या सात दिवसांत पाऊस होईल.

6 / 7
पुढच्या वर्षी पीक पाणी देखील चांगलं राहणार असून, बळीराजासाठी 2026 हे वर्ष चांगलं जाणार आहे. घर धन धान्यानं भरून जाईल.

7 / 7
राजकारणात प्रचंड उलथापालथ पहायला मिळेल, मोठा गोंधळ उडेल, भगव्याचे दिवस येतील असं भाकीत या यात्रेमध्ये वर्तवण्यात आलं आहे, तसेच भारताचं सैन्य जगभरात आपलं शैर्य गाजवेल अशी देखील भाकणूक फरांडेबाबांनी केली आहे.