PHOTO: तुतारीच्या सुरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत, औरंगाबाद शहरातील शाळा-शाळांत उत्साहाचे वातावरण

| Updated on: Oct 04, 2021 | 7:24 PM

औरंगाबाद शहरातील विविध शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कुठे तुतारी, ढोलच्या गजरात मुलांचे स्वागत झाले तर काही शाळांमध्ये गुलाबपुष्प देण्यात आले.

1 / 5
औरंगाबाद महापालिकेतील शाळांमधील आठवी ते दहावीचे वर्ग आजपासून सुरु झाले. पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार, शहरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा आणि महाविद्यालयेदेखील सुरु करण्यात आली. अनेक शाळांमध्ये तुतारी आणि ढोल वाजवत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

2 / 5
औरंगाबाद महानगरपालिकेच्या सत्तावीस शाळांमध्ये आठवीचे वर्ग व 17 शाळांमध्ये नववी व दहावी चे वर्ग आज सुरू करण्यात आले.  एकूण विद्यार्थी 2518 पैकी 1011 विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते. शाळेत प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

3 / 5
 बन्सीलाल नगर विद्यालयात माजी महापौर नंदकुमार घोडेले व गजानन बारवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत  विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पाचे वाटप करून प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला.  या प्रसंगी मनपा उपायुक्त डॉक्टर संतोष टेंगले शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे हे उपस्थित होते.

4 / 5
 प्रियदर्शनी विद्यालयात मनपा उपायुक्त अपर्णा थेटे सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ढोल तुतारीच्या निनादात  विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प चॉकलेट व पेढे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.   अशोक नगर विद्यालयात माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.  अशाच प्रकारे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये शालेय समितीचे सदस्य पालक मुख्याध्यापक व शिक्षक यांनी उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

5 / 5
शहरातील विविध शाळांमध्ये गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच या स्वागत समारोहात कोरोनाविषयक निर्बंधांचेही कटाक्षाने पालन करण्यात आले.