
वाशिम जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा आणि पथदिव्यांच्या वीज बिलापोटी 107 कोटी रुपये थकीत आहेत.

वारंवार मागणी करूनही ही देयके अदा करण्यात ग्रामपंचायती पुढाकार घेत नसल्याने महावितरणने वीज जोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना संकटात आहेत.

थकीत देयकाचे प्रमाण शेकडो कोटीच्या घरात असल्याने महावितरण डबघाईस येत आहे.

वारंवार मागणी करूनही वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणने ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजना आणि पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीमच हाती घेतली आहे