
अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. वर्षाचा पती अनुभव मोहंतीसोबत घटस्फोटाचा वाद सुरू आहे. अनुभव हे बीजेडीचे खासदार आहेत. दोघांचे वैयक्तिक आयुष्य जगजाहीर झाले आहे. पती-पत्नीमधील तणाव वाढतच आहे.

अनुभव मोहंती यांनी पत्नीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वर्षा आणि अनुभव मोहंतीने गेल्या 8 वर्षांपासून आमच्या दोघांचे शारीरिक संबंध नसल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीही अनुभवने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून वर्षाबाबत धक्कादायक खुलासे केले होते.

या व्हिडिओमध्ये अनुभवने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गुपिते उघड केली होती. अनुभव म्हणाला होता की लग्नाला 8 वर्षे झाली पण पत्नीने शारीरिक संबंध ठेवू दिले नाही. अनुभवने सांगितले की, मी मानसिक तणावातून जात आहे. आणखी किती दिवस वाट पाहायची?

अनुभव आणि वर्षा यांच्यात घटस्फोट होण्यामागे हेच प्रमुख कारण आहे. अनुभवने पत्नीकडे घटस्फोट मागितला आहे. दोघांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. वर्षा आणि अनुभव यांचे 2014 मध्ये लग्न झाले . लग्नानंतर काही दिवसांपासून त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

हळुहळु त्यांच्यातील संबंध बिघडू लागले. यानंतर 2016 मध्ये अनुभवने वर्षाविरोधात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये आरोप करण्यात आला होता की त्याला दोन वर्षे झाली आहेत.पण प्रियदर्शिनी शारीरिक संबंध ठेवू देत नाही. यानंतर 2020 मध्ये अनुभवने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

या प्रकरणाला आणखी एक बाजू आहे. ज्यामध्ये वर्षाने पती अभिनव मोहंतीवर घरगुती हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता.अनुभवला दारूचे व्यसन असल्याचेही वर्षा सांगतात. याबरोबरच त्याचे अनेक अफेअर्स आहेत. वर्षा व्यवसायाने अभिनेत्री आहे. ती ओरिया आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम करते. वर्षा तिच्या सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे.

वर्षा 2001 पासून चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.

बाजी या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. यानंतर ती गोलमाल, लव्ह स्टोरी, सबता माँ, जोर, प्रेम रोगी, क्वीन, निमकी यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दिसली आहे

वर्षा आणि अनुभवचे प्रकरण सोशल मीडियावर गाजत आहे. या प्रकरणात सत्य काय आहे, कोण बरोबर आहे, हे माहीत नाही, पण लोकांच्या चर्चेला मात्र उधाण आले आहे .