
आपल्यापैकी अनेकांची नखं ही वारंवार तुटत असतात. कधीकधी ती कमकुवतही होतात. तुमची नखे वारंवार तुटत असतील किंवा कमकुवत झाली असतील, तर याचे कारण तुमच्या शरीराच्या आत लपलेले आहे.

अनेकदा आपण फक्त शारीरिक लक्षणांवर लक्ष देतो, पण नखांमुळे तुम्हाला तुमच्या तब्येतीबद्दलची माहिती समजू शकते. तुमची नखं वारंवार तुटण्यामागे व्हिटॅमिनच्या कमतरता हे मुख्य कारण असू शकते.

अनेक लोकांना असे वाटते की व्हिटॅमिनच्या कमतरतेचा परिणाम फक्त शरीरावर होतो, पण कमकुवत नखं हे देखील शरीराच्या अंतर्गत आरोग्याचे लक्षण आहेत. कमकुवत नखांचे मुख्य कारण व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असू शकते.

या आवश्यक व्हिटॅमिनचा तुमच्या नखांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जर तुमचे नखे सतत तुटत असतील तर तुम्ही तुमच्या व्हिटॅमिन बी १२ च्या पातळीची तपासणी करून घ्यावी.

या आवश्यक व्हिटॅमिनचा तुमच्या नखांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जर तुमचे नखे सतत तुटत असतील तर तुम्ही तुमच्या व्हिटॅमिन बी १२ च्या पातळीची तपासणी करून घ्यावी.

विशेष म्हणजे व्हिटॅमिन बी१२ कमी असेल तर सतत थकवा, अशक्तपणा, आळस, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा वारंवार चक्कर येणे असेही गंभीर परिणाम होऊ शकतात.

जर तुमच्यात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही विशिष्ट गोष्टींचा समावेश करून त्यावर मात करू शकता. चिकन, मासे आणि अंडी योग्यरित्या खा. तसेच दुधात व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण चांगले असते. मूग डाळ खा. यामुळे व्हिटॅमिन बी १२ वाढतेय.

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर व्हिटॅमिन बी १२ च्या गोळ्या देखील घेऊ शकता. मात्र कोणताही आहार बदल किंवा सप्लिमेंट्स सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आठवणीने घ्या.