Maharashtra Weather : हवामानात बदल, दुहेरी संकट, हवामान विभागाचे नवीन अपडेट..

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल होणार आहे. उत्तरेकडून संकट येताना दिसतंय.

| Updated on: Nov 29, 2026 | 8:12 AM
1 / 5
राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढल्याचे बघायला मिळत आहे. तापमानात सतत चढउतार होत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला.

राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढल्याचे बघायला मिळत आहे. तापमानात सतत चढउतार होत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला.

2 / 5

पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्टात गारठा वाढला आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत आहे. राज्यातील नीचांकी तापमान गोंदिया येथे नोंदवण्यात आले. गोंदिया येथे 11.6 अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

3 / 5

नागपूर येथे 13.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा येथे 14 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. यवतमाळ आणि नाशिक येथे 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजही तापमानात चढउतार कायम राहिल.

4 / 5

विदर्भात कमाल तापमानात घट होईल. दुपारच्यावेळी प्रचंड उष्णता जाणवत आहे. रात्री आणि सकाळी थंडी जाणवत आहे. सतत हवामान बदलत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न उपस्थित होत आहे.

5 / 5

राज्यात पुढील काही दिवसात उष्णता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. तापमानात चढउतार राहणार आहे. राज्य सरकारने अगोरदरच दुष्काळाची घोषणा केली. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us