
हिंदू धर्मात विवाहाला अत्यंत पवित्र आणि शुभ कार्य मानले जाते. दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबांना एकत्र आणणारा हा सोहळा जीवनातील एक नवी सुरुवात असतो. त्यामुळे लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत काळजी घेणे आवश्यक असते.

अलीकडे लग्नामध्ये अनेक आधुनिक ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत, त्यापैकी एक म्हणजे लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो वापरणे. पण वास्तूशास्त्र आणि धार्मिक दृष्टिकोनातून हे करणं योग्य आहे की नाही, याबाबत आपण जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार, लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो छापण्याचा ट्रेंड अशुभ मानला जातो. लग्नपत्रिका हे एक शुभ कार्य आणि वधू-वरांच्या आगामी पवित्र नात्याचे प्रतीक असते.

ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या जाणकारांनुसार, लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो लावल्यास त्यांना वाईट नजर लागू शकते. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात भविष्यात समस्या आणि मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते.

त्याऐवजी लग्नपत्रिकेवर देवाचे चित्र किंवा श्री गणेशाय नमः, शुभ विवाह यांसारखी शुभ वाक्ये छापण्यात यावीत. लग्नानंतर बरेच लोकं पत्रिका कुठेही टाकून देतात. जर पत्रिकांवर वधू-वरांचे फोटो असतील आणि त्या कुठेही फेकल्या गेल्या, तर ते त्या जोडप्याचा अपमान झाल्यासारखे वाटते.

लग्नपत्रिका तयार करताना जुन्या परंपरा आणि नवीन ट्रेंड यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार, लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो लावणे टाळावे. त्याऐवजी गणपतीचे चित्र किंवा शुभ वाक्ये वापरावीत, जेणेकरून वैवाहिक जीवन सुखी आणि निर्विघ्न होईल.