
OTT वर दर आठवड्याला काही ना काही नवं येत राहतं, पण प्रश्न असतो तो फक्त एकच नेमकं काय पाहावं जेणेकरून दिवस छान जाईल. तर या आठवड्यात तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सर्वोत्तम फिल्म्स आणि सीरिजची संपूर्ण यादी. या यादीमध्ये बॉलिवूड, हॉलिवूड आणि साऊथच्या गाजलेल्या गोष्टींचा समावेश आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित 'निशांची' हा सिनेमा यंदा सिनेमाघरात रिलीज झाली होती आणि समीक्षकांनी तिला खूप प्रेम दिलं होतं. आता 14 नोव्हेंबरपासून ती Amazon Prime Video वर उपलब्ध होत आहे.

प्रदीप रंगनाथन दिग्दर्शित रोमँटिक-कॉमेडी डूड (Dude) हा तमिळ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला म्हणजे आजच Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शिक होत आहे. या चित्रपटात प्रदीप एका बॅड बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या आयुष्यातील संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. तसेच त्याच्या लव्हस्टोरीवर विशेष भर देण्यात आली आहे.

14 नोव्हेंबरलाच Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर डायनामाइट किस नावाची एक कोरिअन वेब सीरिज देखील प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये एक अविवाहित मुलगी नोकरी मिळवण्यासाठी स्वतःलाचे लग्न झाल्याचे सांगते. पण तिचा बॉसला पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडतो. ही वेब सीरिज सर्वांना हसायला भाग पाडते आणि सीरिजमध्ये रोमान्सही दाखलण्यात आला आहे.

14 नोव्हेंबरलाच Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच इन योर ड्रीम्स ही फॅमिली-फँटसी फिल्म येत आहे. यात इलियट आणि तिची बहीण स्टीवी रोज यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आई-बाबांच्या दररोजच्या भांडणाला कंटाळलेल्या असतात, मग त्यांच्या आयुष्यात एक जादुई सँडमॅन येतो आणि सगळंच बदलून जातं. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

जुरासिक वर्ल्ड: रीबर्थ ही स्कार्लेट जोहान्सनचा मोठा चित्रपट यंदा सिनेमाघरात प्रदर्शित होत आहे. आता 14 नोव्हेंबरपासून हा चित्रपट Disney+ Hotstar वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा जुरासिक वर्ल्ड डॉमिनियननंतर जवळपास सहा वर्षांनी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात नवीन बेट दाखवण्यात आले आहे. या बेटावर प्रचंड ॲक्शन सीन्स शूट करण्यात आले आहे. एकंदरीत हा चित्रपट पाहाताना प्रेक्षकांना मजा येणार आहे.

अ क्वायट प्लेस: डे वन हा 2024 मध्ये रिलीज झालेला चित्रपट आहे. आता हा चित्रपट Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहे (काही देशांत १४ नोव्हेंबरपासून). हा 2018च्या अ क्वायट प्लेसचा प्रीक्वल आहे आणि जगात एलियन्स कसे आले आणि पहिला दिवस कसा होता हे दाखवते. पूर्णपणे काल्पनिक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी तु्म्हाला सिनेमा पाहावा लागणार आहे.