
मेथीच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. विशेष म्हणजे मेथीमुळे वजनही झटपट कमी होण्यास मदत होते. यासोबतच आरोग्याच्या अनेक समस्या देखील दूर होतील.

मेथीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, निकोटिनिक अॅसिड, नियासिन, बायोटिन, कॅल्शियम ए, बी 1, बी 2, सी अशी जीवनसत्त्वे असतात.

यामुळे दररोजच्या आहारात मेथीच्या बियांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे मेथीमुळे वाढलेले वजनही झटपट कमी होण्यास मदत होते.

मेथी अधिक गरम असल्याने त्याचे प्रमाण योग्य असणेही आवश्यक आहे. मेथीचा अतिरिक्त वापरही आरोग्यासाठी हानिकारक नक्कीच ठरू शकतो.

मेथी चयापचय वाढवते आणि पचन सुधारते. ज्यामुळे जलद वजन कमी होण्यास मदत होते. मेथीच्या अवघ्या काही बियांमुळे आरोग्याच्या असंख्य समस्या कमी होतात.