31st March Deadline : 31 मार्चच्या अगोदर करून घ्या ही कामे, अन्यथा मोठं नुकसान, खिसा रिकामा झालाच म्हणून समजा!
मार्च महिना संपत आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्यात अनेक नियमांत बदल होणार आहे. तसेच मार्च महिना संपला की काही महत्त्वाची कामे करून घेण्याची मुदतही संपुष्टात येणार आहे. अनेक कामे ही 31 मार्चच्या अगोदर करून घेणे गरजेचे आहे.

मार्च महिना संपत आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्यात अनेक नियमांत बदल होणार आहे. तसेच मार्च महिना संपला की काही महत्त्वाची कामे करून घेण्याची मुदतही संपुष्टात येणार आहे. अनेक कामे ही 31 मार्चच्या अगोदर करून घेणे गरजेचे आहे. ही कामे कोणती आहेत, ते जाणून घेऊ या..

तुम्ही असेसमेंट ईयर 2021-22 (FY 2020-21) साठी रिटर्न्स भरलेला नसेल किंवा त्यात एकादी चूक केलेली असेल तर ही चूक दुरुस्त करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. ज्या लोकांनी जुलैच्या डेटलाईनपर्यंत रिटर्न भरलेला आहे, आता त्यांना 31 मार्चपर्यंत दंड भरून बिलेटेड रिटर्न फाईल करता येईल.

आर्थिक वर्ष 2025-26 साठी कलम 80C (PPF, ELSS, LIC) अंतर्गत तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंत सूट हवी असेल तर त्यासाठी गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी असेल. तुम्ही न्यू टॅक्स रिजीम हा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार नाही. नव्या करप्रणालीअंतर्गत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलेले आहे.

आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी टीडीएस सर्टिफिकेट जारी करण्याची मुदत वाढवून 31 मार्च 2026 करण्यात आली आहे. तसेच PPF, NPS या सुकन्या समृद्धी योजने (SSY) खाते सक्रीय ठेवण्यासाठी खात्यात किमान रक्कम मेन्टेन ठेवण्यासाठीची मुदत 31 मार्च 2026 आहे.

अर्थसंकल्प 2026 च्या नियमानुसार असेसमेंट इअर म्हणजेच 31 मा र्चपर्यंत तुम्ही तुमचा रिटर्न रिव्हाईज करू शकता. अगोदर याची मुदत 31 डिसेंबर होती.