
डिझाईन चांदीचा चहा सेट - मोदी यांनी कोरीव नक्षीकाम असलेला मुर्शिदाबादचा चांदीचा चहा सेटही पुतिन यांना भेट दिला आहे. पश्चिम बंगालची समृद्ध कलाकुसर तसेच भारत आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये चहाचे सांस्कृतिक महत्व यातून स्पष्ट होते.

चांदीचा घोडा - महाराष्ट्रातील हस्तनिर्मित चांदी घोडा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना गिफ्ट केला आहे. यात धातूची हस्तकला परंपरा दिसत आहे. भारत आणि रशियन संस्कृतीत घोडा हा शौर्याचे प्रतिक मानला जातो.

काश्मिरी केशर - काश्मीरी केशर ज्याला स्थानिक पातळीवर कोंग किंवा झफ्रान म्हणून ओळखले जाते. काश्मीरमध्ये लागवड केलेले केसर रंग, सुगंध आणि चवीसाठी मौल्यवान आहे. जीआय टॅग आणि ओडीओपी मान्यताद्वारे संरक्षित केशर असून ते आरोग्यासाठी फायद्याचे आहे.

संगमरवरी बुद्धीबळाचा संच - मोदींनी रशियाच्या अध्यक्षांना आग्रा येथील हस्तकारागिरांनी तयार केलेला बुद्धीबळ संच देखील भेट दिला आहे. संगमरवरी बुद्धीबळाचे प्यादे आणि फुलांच्या डिझाइन असलेले चेकर्ड संगमरवरी बोर्ड हे उत्तर भारतीय कलात्मकतेचा उत्कृष्ट नमूना आहे.

आसाम ब्लॅक टी - ब्रह्मपुत्र मैदानात उगवणारा आसाम ब्लॅक टी त्याच्या चवीसाठी ओळखला होता. हा चहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भेट दिला आहे. २००७ मध्ये आसाम ब्लॅक टीला GI टॅगसह मान्यता मिळाली आहे.

श्रीमद् भगवद्गीता (रशियन भाषेत) - महाभारतातील भगवान कृष्णाने अर्जूनला दिलेला संदेश म्हणजे श्रीमद् भगवत् गीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भेट दिली आहे. विशेष म्हणजे ही रशियन भाषेत भाषांतर केलेली प्रत आहे.