
मूळव्याध! मूळव्याध ही समस्या बऱ्याच लोकांना आहे. तिखट खाणाऱ्या लोकांना अनेकदा मूळव्याध होतो. तिखट मसाल्याने अंगातली हिट वाढते, हिट वाढल्याने साहजिकच मूळव्याध सारख्या समस्या उद्भवतात.

त्वचा कोरडी होणे ही एक समस्या आहे. तिखट खाल्ल्याने त्वचेचा ओलावा कमी होतो. तिखट प्रमाणात खाल्ल्याने या समस्या उद्भवत नाहीत. त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मसालेदार प्रमाणात खा. तिखट कमी खा.

तिखट खाल्ल्याने भूक लागते. होय! तिखट, मसालेदार पदार्थांमध्ये कॅलरीज खूप असतात. हे खाल्ल्याने भूक लागू शकते. त्यामुळे तिखट खाऊन वजन वाढते. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मसालेदार पदार्थांपासून लांब राहावे.

असं म्हणतात की तिखट कमी खाल्ल्याने राग कमी येतो. यामागे काही वैद्यकीय गोष्टी सुद्धा आहेत. तिखट जास्त खाल्ल्याने बीपी वाढतो. जर तुम्हाला हाय बीपी म्हणजेच रक्तदाबाची समस्या असेल तर तिखटापासून जरा लांबच रहा. मसालेदार खाल्ल्याने हृदयविकाराच्या समस्या देखील उद्भवतात.

काही लोकांना तिखट खायला प्रचंड आवडतं. पण तिखट खायचे अनेक तोटे आहेत त्यातला एक सगळ्यांना माहित असणारा आणि सगळ्यांनी अनुभवलेला तोटा म्हणजे पोटाची समस्या. जास्त तिखट खाल्ल्याने अपचन, गॅस आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तिखट खाल्ल्याने पोट बिघडते त्यामुळे मसालेदार खाताना प्रमाणात खा.