Tejashri Pradhan : तेजश्री प्रधानच्या पायाला झालं तरी काय! दीड महिन्यांपासून फ्रॅक्चर, फोटो पोस्ट करत म्हणाली…

Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तेजश्री हिच्या पायाला दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने पायाचा फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

| Updated on: Oct 30, 2026 | 12:19 PM
1 / 5
अभिनेत्री तेजश्री प्रधान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आली आहे. तेजश्री हिच्या पायाला दुखापत झाली आहे. ज्याचा फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आली आहे. तेजश्री हिच्या पायाला दुखापत झाली आहे. ज्याचा फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

2 / 5

नुकत्याच झालेल्या झी मराठी अवॉर्डमध्ये तेजश्री प्रधानने हिने सुबोध भावेबरोबर डान्स केला. तेव्हा संपूर्ण शोमध्ये क्रॉक्स घातलेले. क्रॉक्स म्हणजे चपलेचा एक प्रकार आहे. क्रॉक्स घातल्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला चपलेबद्दल विचारलं.

3 / 5

त्यानंतर तेजश्री हिने अखेर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फ्रॅक्चर पायाचा फोटो शेअर करत नेमकं काय झालं आहे सांगितलं. फोटो पोस्ट करत तेजश्री म्हणाली, 'माझ्या या विचित्र फॅशनला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद...', असं अभिनेत्री विनोदी अंदाजात म्हणाली.

4 / 5

तेजश्री म्हणते, 'क्रॉक्सच का?' असा प्रश्न मला आता अनेक जण विचारत आहेत. त्यामागचं कारण असं आहे की, गणपतीच्या पहिल्याच दिवशी माझ्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झालं होतं आणि अजूनही ते बोट बरं होत आहे. तेव्हापासून माझ्या पायातील हे फुटवेअर माझ्या त्या छोट्याशा बोटाचं संरक्षण करत आहे."

5 / 5

तेजश्री हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तेजश्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us