
मासिक पाळीदरम्यान महिलांना पूजा किंवा उपवास करण्यास मनाई केली जाते. अशा परिस्थितीत अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न उपस्थित होतो की जर 16 सोमवारचं व्रत करताना पाळी आली तर काय करावं? सुरुवातीपासून व्रताचा संकल्प घ्यावा की एक सोमवार अधिक उपवास करावा, असा अनेकांचा सवाल असतो. त्याचं उत्तर जाणून घेऊयात.

श्रावण महिन्यापासून अनेकजण 16 सोमवार व्रताची सुरुवात करतात. त्यामुळे या व्रतादरम्यान जर मासिक पाळी आली तर व्रताचा संकल्प पूर्णपणे तोडणं गरजेचं नाही. तुम्ही 16 सोमवारच्या व्रताचा संकल्प पूर्ण करू शकता.

जर 16 सोमवारच्या व्रतादरम्यान पाळी आली तर तुम्ही तुमचं व्रत सुरू ठेवा, परंतु पूजेत सहभागी होऊ नका. तुम्ही मंत्रजाप करून शंकराची आराधना करू शकता. पाळी संपल्यानंतर तुम्ही पुन्हा विधीवत पूजा करू शकता.

सोळा सोमवारच्या व्रतादरम्यान जर तुम्हाला मासिक पाळी आली तर महिलांना पूजेपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या महिलेकडून म्हणजेच दुसऱ्या महिलेच्या हस्ते तुमची पूजा करू शकता.

व्रतादरम्यान मासिक पाळी आली तरीही तुम्ही 17 व्या सोमवारी त्याचं उद्यापन करणं महत्त्वाचं आहे. भगवान शंकर तुमची स्थिती आणि प्रार्थना समजतील आणि त्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला अवश्य देतील, असं म्हटलं जातं.