
तृतीयपंथीयांना दान देणं शुभ मानलं जातं. तृतीयपंथीयांचा आशिर्वाद वरदान समान मानला जातो. म्हणून तृतीयपंथीयांना कधी रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये.

अनेकदा ट्रेन प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी तृतीयपंथीय पैसे मागतात. तृतीयपंथीयांना दान देण्यासाठी कुठला दिवस चांगला आहे, ते सुद्धा जाणून घ्या.

तृतीयपंथीयांना काही दान द्यायचं असेल, तर बुधवारच्या दिवशी द्या. हा चांगला दिवस मानला जातो.

तृतीयपंथींना धान्य, कपडे, पैसे या श्रृंगाराच्या वस्तू दान देणं शुभ मानलं जातं.

बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे, सौभाग्याच्या वस्तू, ढोल दान विशेष करुन शुभ मानलं जातं. तृतीयपंथीयांना दान दिल्याने बुध ग्रह मजबूत होतो. घरात सुख समृद्धी येते.