
black magic अनेकदा निर्जन स्थळी, पर्वतावर तुम्हाला काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, मिरची, हळदी-कुंकू दिसतं. महाराष्ट्रासह भारतातही अनेक ठिकाणी असे अघोरी प्रकार केले जातात.

अशा प्रकारची जादू करून एखाद्यावर सूड उगवण्यासाठी, आर्थिक लाभ मिळवण्याठी, खजिना शोधण्यासाठी किंवा अन्य अमुक फायदा घडवून आणण्यासाठी अशा प्रकारची अवैज्ञानिक कामं केली जातात. यालाच काही ठिकाणी काळी जादू असंही म्हटलं जातं.

वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव, शिक्षणाचा अभाव आणि भोंदूबाबांना बळी पडून अनेकजण काळ्या जादूचे प्रयोग करतात. अशा प्रयोगापोटी काही जण तर हजारो रुपये गमावून बसतात. परंतु त्यांचे इप्सित साध्य होत नाही.

महाराष्ट्रात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे. अंधश्रद्धेला बळी पडून काळ्या जादूसारखे अघोरी प्रकार केले तर या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे काळी जादू यासारखे प्रकार अस्तित्त्वात नसून अशा प्रयोगांच्या आहारी जाऊ नये, असे सांगितले जाते.

ग्रामीण भागात किंवा शहरी भागातील अंधश्रद्ध लोकही दैवी चमत्कारासारख्या अस्तित्त्वात नसलेल्या संकल्पनांना बळी पडतात. त्यामुळे काळी जादू असा कोणताही प्रकार अस्तित्त्वात नसून लिंबू, मिरची, हळद कुंकू, बाहुल्या यांच्या माध्यमातून लोकांना फक्त घाबरवण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे सांगितले जाते. (टीप- या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)