
पृथ्वीतलावर अनेक अजब-गजब गोष्टी आहेत. यातील काही गोष्टी तर एवढ्या अजब आहेत त्या पाहिल्यानंतर आपण थक्क होऊन जातो. समुद्राचे विश्व तर चांगलेच गुढ आहे. यातील अनेक गुढ गोष्टींचा उलगडा झालेला नाही.

याच पृथ्वीवर असा एक समुद्र आहे, ज्यात एकही मासा नाही. विशेष म्हणजे फक्त मासाच नव्हे तर या समुद्राच्या पाण्यात कोणतेही झाड किंवा इतर प्राणीदेखील आढळत नाही. समुदाचा हाच चमत्कार पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करतात.

या सागराला मृत सागर असे म्हटले जाते. इस्रायल आणि जॉर्डन या दोन्ही देशांच्या मध्ये हा सागर आहे. पाण्याची खोली आणि पाण्यात असलेले क्षार या मृत सागरात एकही जीव जगू शकत नाही. परिणामी या सागरात एकही मासा आढळत नाही.

मृत सागराचे पाणी इतर सागरांच्या तुलनेत दहा पटीने जास्त खाट आहे. या सागराच्या पाण्याची आणखी एक विशेषता म्हणजे त्यात एखादी व्यक्ती उतरली तर ती बुडत नाही. मृत सागरात माणूस तरंगायला लागतो.

याच आगळ्यावेगळ्या कारणामुळे जगभरातील लोक मृत समुद्र पाहायला येतात. पाण्यात राहून न बुडण्याचा अनुभव घेतात. काही लोक तर या समुद्राच्या पाण्यात जाऊन पेपर वाचत बसतात. सध्या दरवर्षी या सागरातील पाणीपातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात या सागराचे अस्तित्व संपणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो.

(टीप- या स्टोरीतील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या स्त्रोतांवर आधारलेली असून ही माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा)