
आपण आजारी पडलो की अगोद डॉक्टरकडे जातो. परंतु आरोग्य क्षेत्रातील बऱ्याच संकल्पना आपल्याला माहिती नसतात. आपण मी हॉस्पिटलला जाऊन आलो, असे थेट सांगून टाकतो. परंतु आरोग्य क्षेत्रात हॉस्पिटल, क्लिनिक, डिस्पेन्सरी, नर्सिंग होम अशा वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या समजून घेणे गरजेचे आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

हॉस्पिटल हे रुग्णांची काळजी घेणारे मोठे रुग्णालय असते. इथे उपचाराच्या वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात. शस्त्रक्रिया, आयसीयू, डॉयग्नॉस्टिक सेंटर तसेच विशेष उपचारही हॉस्पिटलमध्ये दिले जातात. हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या सर्व सुविधा असतात. इथे डॉक्टर, नर्सेस, सर्जन, अॅनास्तेसियोलॉजिस्ट, असा बराच स्टाफ असतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

क्लिनिक हे हॉस्पिटलच्या तुलनेत छोटे असते. क्लिनिकमध्ये आउटपेशंट केअर आणि नियमित मेडिकल सेवा दिली जाते. क्लिनिकमध्ये डॉक्टर खासगी तत्त्वावर वैयक्तिकरित्या सेवा देतात. अशा क्लिनिकमध्ये डॉक्टर एखाद्या विशेष आजारावर उपचार करण्यात निष्णात असू शकतात. क्लिनिकमध्ये नियमित आजारावर उपचार केले जातात. क्लिनिकमध्ये रुग्णांना अॅडमिट करून घेण्याची सुविधा नसते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

डिस्पेन्सरी हेदेखील एक वैद्यकीय सेवा देणारे ठिकाण आहे. या ठिकाणी रुग्णांना औषध दिले जाते. डिस्पेन्सरीला औषधालय असेदेखील म्हणतात. डिस्पेन्सरी हे एखाद्या हॉस्पिटलचाच भाग असू शकतात. डिस्पेन्सरीमध्ये रुग्णांना भरती केले जात नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नर्सिंग होममध्ये नर्सिंगच्या सुविधा दिल्या जातात. ज्या लोकांना रोजच आरोग्याशी संबंधित मदत हवी असते, अशा लोकांना नर्सिंग होममध्ये सेवा पुरवल्या जातात. जुने आजार, अपंगत्त्व असलेल्या लोकांची इथे काळजी घेतली जाते. नर्सिंग होममध्ये रुग्णांना कित्येक महिन्यांसाठी दाखल केले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)