टीम इंडियाचा भरवशाचा गोलंदाज अचानक महागडा ठरतोय; अक्षर पटेलला नेमकं झालंय तरी काय?

टी-20 क्रिकेटमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजांना रोखणारा अक्षर पटेल सध्या संघर्ष करताना दिसतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने 4 षटकांत 51 धावा दिल्या.

| Updated on: Oct 23, 2026 | 10:25 PM
1 / 5
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलची गोलंदाजी महाग ठरली. त्याने 4 षटकांत 51 धावा देत 1 विकेट घेतली.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलची गोलंदाजी महाग ठरली. त्याने 4 षटकांत 51 धावा देत 1 विकेट घेतली.

2 / 5

टी-20 क्रिकेटमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणे ही अक्षरची ताकद मानली जाते. मात्र, अलीकडच्या सामन्यांत त्याच्या गोलंदाजीतील अचूकता आणि वेगावरील नियंत्रण कमी झाल्याचे दिसत आहे.

3 / 5

विश्वचषकानंतरच्या 17 टी-20 सामन्यांत अक्षरने प्रति षटक सरासरी 9.1 धावा दिल्या आहेत. त्याचा आधीचा इकॉनॉमी रेट 7.7 होता.

4 / 5

इंग्लंडविरुद्ध अक्षरने प्रति षटक 11.14, वेस्ट इंडिजविरुद्ध 12.21, तर न्यूझीलंडविरुद्ध 12.75 धावा दिल्या आहेत. या आकडेवारीमुळे त्याच्या गोलंदाजीच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त होत आहे.

5 / 5

अक्षर पटेलला संघातून वगळायचे की त्याला आणखी संधी द्यायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तो अनुभवी आणि महत्त्वाचा खेळाडू असल्याने निवडकर्त्यांसमोर निर्णय घेण्याचे आव्हान आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us