रोज आवडीने जांभूळ खाता, पण त्याला इंग्रजीत काय म्हणतात माहिती आहे का? 99 टक्के लोक अपयशी

आयुर्वेदातही या फळाला औषधी मानले गेले आहे. जांभूळ आणि विशेषतः त्याच्या बियांची पूड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास अत्यंत प्रभावी मानली जाते.

| Updated on: May 21, 2026 | 2:56 PM
1 / 6
उन्हाळा सुरू झाला की बाजारात काळ्या, रसाळ जांभळांची आवक वाढू लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना हे फळ प्रचंड आवडते. हे केवळ एक चवदार फळ नसून आरोग्यासाठी निसर्गाचा एक मोठा चमत्कार मानले जाते. आज आपण जांभळाबद्दलची सविस्तर माहिती आणि त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

उन्हाळा सुरू झाला की बाजारात काळ्या, रसाळ जांभळांची आवक वाढू लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना हे फळ प्रचंड आवडते. हे केवळ एक चवदार फळ नसून आरोग्यासाठी निसर्गाचा एक मोठा चमत्कार मानले जाते. आज आपण जांभळाबद्दलची सविस्तर माहिती आणि त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

2 / 6

आपण अनेकदा जांभूळ खातो. पण त्याला इंग्रजीत काय म्हणतात हे अजिबात ठाऊक नसते. जांभूळला इंग्रजीमध्ये प्रामुख्याने Java Plum किंवा Black Plum म्हटले जाते. याशिवाय या फळाला Malabar Plum किंवा Jambul या नावांनीही ओळखले जाते. याचे वैज्ञानिक नाव Syzygium cumini असे आहे.

3 / 6

जांभळामध्ये व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. आयुर्वेदातही या फळाला औषधी मानले गेले आहे. जांभूळ आणि विशेषतः त्याच्या बियांची पूड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास अत्यंत प्रभावी मानली जाते.

4 / 6

जांभळामध्ये 'जांबोलिन' (Jamboline) असते. त्यामुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्याची प्रक्रिया मंदावते. जांभळामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्टता, गॅस आणि अपचनासारख्या समस्या दूर होतात.

5 / 6

जांभळात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असते. त्यामुळे त्वचा डिटॉक्स होते, ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन त्वचा चमकदार बनते. जांभूळ खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.

6 / 6

जांभूळ हे रक्तवाढीसाठी उपयुक्त असते. जांभळामध्ये आयर्न (लोह) भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे फळ उत्तम मानले जाते. ज्यामुळे मोसमी आजारांपासून शरीराचे रक्षण होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us