लग्न न करता एकत्र राहिल्यास या मुस्लीम देशात भयंकर शिक्षा, नियम वाचून बसेल धक्का!

इंडोनेशियामध्ये 2 जानेवारी 2026 पासून लागू झालेल्या नवीन फौजदारी कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध ठेवल्यास एक वर्षापर्यंत, तर लग्नाशिवाय एकत्र राहिल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

| Updated on: Nov 21, 2026 | 10:13 PM
1 / 5
आजकाल ईव्ह इन रिलेशनशीपची सगळीकडे चर्चा आहे. लग्न न करता एकमेकांसोबत राहण्याचे प्रमाणही वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर काही देशांत लग्न न करता राहिल्यास काय कायदा आहे, ते जाणून घेऊ या...

आजकाल ईव्ह इन रिलेशनशीपची सगळीकडे चर्चा आहे. लग्न न करता एकमेकांसोबत राहण्याचे प्रमाणही वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर काही देशांत लग्न न करता राहिल्यास काय कायदा आहे, ते जाणून घेऊ या...

2 / 5

सौदी अरेबियामध्ये विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असून दोषींना तुरुंगवास किंवा देशातून हद्दपार केले जाऊ शकते. कतारमध्ये विवाहाशिवाय एकत्र राहणे आणि शारीरिक संबंध ठेवणे गुन्हा मानला जातो. तर कुवेतमध्ये अविवाहित स्त्री-पुरुषांच्या एकत्र राहण्यावर निर्बंध असून नियमभंग केल्यास दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो.

3 / 5

इंडोनेशियामध्ये 2 जानेवारी 2026 पासून लागू झालेल्या नवीन फौजदारी कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध ठेवल्यास एक वर्षापर्यंत, तर लग्नाशिवाय एकत्र राहिल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. मात्र, कारवाईसाठी संबंधित व्यक्तींच्या कुटुंबीयांची तक्रार आवश्यक आहे. इराणमध्ये विवाहबाह्य संबंधांना गंभीर गुन्हा मानले जाते आणि परिस्थितीनुसार कठोर शिक्षा होऊ शकते.

4 / 5

मलेशियामध्ये मुस्लिम नागरिकांसाठी 'खलवत' हा कायदा लागू आहे. कोणतेही वैवाहिक किंवा जवळचे नाते नसताना स्त्री-पुरुष संशयास्पद परिस्थितीत एकांतात आढळल्यास कारवाई होऊ शकते. ब्रुनेईमध्येही अशा वर्तनाला गुन्हा मानले जाते. दोषींना दंड किंवा एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

5 / 5

इजिप्तमध्ये विवाहबाह्य शारीरिक संबंध बेकायदेशीर मानले जातात. मात्र, केवळ लग्न न करता एकाच घरात राहणे आणि विवाहबाह्य संबंध ठेवणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. मोरोक्कोमध्ये फौजदारी संहितेच्या कलम 490 नुसार अविवाहित स्त्री-पुरुषांमधील शारीरिक संबंध हा गुन्हा असून एक महिना ते एक वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us