इराणमध्ये लग्नाची अजब प्रथा, मुलगी 13 व्या वर्षीच होते आई; ती तरतूद वाचून धक्काच बसेल!

सध्या संपूर्ण जगात इराण हा देश चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इराणमध्ये लग्नाचे कायदेशीर वय काय आहे? असे विचारले जात आहे. मुलगा आणि मुलीसाठी लग्नाच्या किमान वयाची अट इथे वेगळी आहे. ही अट काय आहे, ते जाणून घेऊ या..

| Updated on: Apr 06, 2026 | 6:38 PM
1 / 5
अमेरिकेविरोधातील युद्धामुळे इराणची चर्चा जगभरात होत आहे. हा देश इस्त्रायल आणि अमेरिका अशा दोन देशांविरोधात एकाच वेळी लढत आहे. दरम्यान, या देशात असलेल्या परंपरा आणि कायदे यांचीही चर्चा होत आहे. या देशात मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय काय आहे? याबाबत विचारले जात आहे.

अमेरिकेविरोधातील युद्धामुळे इराणची चर्चा जगभरात होत आहे. हा देश इस्त्रायल आणि अमेरिका अशा दोन देशांविरोधात एकाच वेळी लढत आहे. दरम्यान, या देशात असलेल्या परंपरा आणि कायदे यांचीही चर्चा होत आहे. या देशात मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय काय आहे? याबाबत विचारले जात आहे.

2 / 5

भारतात मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय हे 18 वर्षे आहे. पुरुषाच्या लग्नाचे किमान वय 21 वर्षे आहे. इराणमध्ये मात्र लग्नासाठी वयाचा वेगळा नियम आहे. इराण सिव्हिल कोडमधील कलम 1041 नुसार इराणमध्ये मुलगी फक्त 13 वर्षांची असली तरीही लग्न करू शकते.

3 / 5

इराणमध्ये मुलीच्या लग्नाचे किमान वय 13 तर मुलाच्या लग्नाचे किमान वय 15 वर्षे आहे. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत मुलगी 13 वर्षांपेक्षा कमी वयाची असली तरीही तिथे लग्नाच परवागनी दिली जाते. तेथील न्यायाधीशाने परवानगी दिल्यास मुलीचे लग्न 13 वर्षांच्या अगोदरही होऊ शकते.

4 / 5

इराणमध्ये कायद्यानुसार मुलीच्या लग्नाचे वय 13 वर्षे असले तरीही तेथे 17 टक्के मुलींचे लग्न हे 18 वर्षे झाल्यानंतरच होते. तसेच 3 टक्के मुलींचे लग्न 15 वर्षाच्या अगोदर होते. इराणमध्ये 25 वर्षे झाल्यानंतर लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे.

5 / 5

दुसरीकडे तरुणदेखील 29 किंवा 30 वर्षानंतरच लग्न करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. इराणच्या कायद्यानुसार काही गोष्टी करण्यासाठी महिलांना तिच्या पतीची परवानगी असणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ पासपोर्ट, परदेश यात्रा करायची असेल तर महिलांना तिच्या पतीची परवानगी असणे बंधनाकारक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us