
प्रत्येकालाच विमानाने प्रवास करावा वाटतो. आयुष्यात एकदातरी विमानातून सफर करायला मिळावी, असे अनेकांचे स्वप्न असते. विमानातून प्रवास करताना मात्र फारच काळजी घ्यावी लागते. एखादी क्षुल्लक चूक सर्वांचा जीव घेऊ शकते. त्यामुळेच विमान प्रवास करताना काही गोष्टींची माहिती असणे फार गरजेचे आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

विमानातून प्रवास करायचा असेल तर वेगवेगळ्या नियमांचे पालन करावे लागते. येतील एखाद्या नियमाचे उल्लंघन केल्यास सर्वांच्याच जीवाला धोका निर्माण होऊ शकते. ज्या प्रमाणे विमानातून प्रवास करणाऱ्यांना काह नियमावली असते अगदी तशीच नियमावली विमान, वैमानिक, विमानतळालाही असते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

वैमानिक, विमानतळाला नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. नियमानुसार विमानतळाच्या प्रशासनाला विमानाच्या धावपट्टीवर काही आकडे लिहावे लागतात. या आकड्यांचा खास अर्थ असतो. याच आकड्यांच्या मदतीने वैमानिक विमानाचे टेकऑफ किंवा लँडिंग करतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

तुम्हाला विमानाच्या धावपट्टीवर मोठ्या-मोठ्या आकाराचे काही आकडे लिहिलेले आढळतात. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. या आकड्यांच्या मदतीने रनवे कोणत्या दिशेला आहे, हे पायलटला समजते. तसेच विमानाचे टेकऑफ करण्यासाठी विमान उतरवण्यासाठी कोणत्या रनवेचा उपयोग करायचा? हेदेखील वैमानिकांना या आकड्यांच्या मदतीनेच समजते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

सोबतच या आकड्यांच्या मदतीने सध्या हवा कोणत्या दिशेला आहे, हेही समजून येते. याच आकड्यांच्या मदतीने वैमानिक विमानाचे डेकऑफ करणे योग्य की आयोग्य हे ठरवत असतो. (वरील लेखात इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा) (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)