Strong Beer : ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
बिअर तयार करण्याच्या पूर्ण प्रक्रियेला ब्रुईंग असे म्हणतात. ज्या ठिकाणी बिअर तयार केली जाते त्याला ब्रेवरी असे म्हटले जाते. संस्कृत भाषेत बिअरला यव असे म्हटले जाते. म्हणूनच बिअरला यवसुरा असे म्हटले जाते.

भारतात लाखो लोक मद्य आवडीने प्राशन करतात. काही लोकांना बिअर हा मद्यप्रकार खूप आवडतो. पार्टी, आनंदाच्या क्षणी अनेकजण बिअर पिणेच पसंद करतात. दरम्यान, बिअरचे अनेक प्रकार आहेत. सर्वात स्ट्राँग बिअर कोणती आहे, ते जाणून घेऊ या...
बिअर तयार करण्याच्या पूर्ण प्रक्रियेला ब्रुईंग असे म्हणतात. ज्या ठिकाणी बिअर तयार केली जाते त्याला ब्रेवरी असे म्हटले जाते. संस्कृत भाषेत बिअरला यव असे म्हटले जाते. म्हणूनच बिअरला यवसुरा असे म्हटले जाते.
काही लोकांना एकदम स्ट्राँग बिअर प्यायला आवडते. तर काही लोकांना अल्कोहोलचे प्रमाण कमी असणारी बिअर आवडते. देशातील सर्वात स्ट्राँग बिअर ही स्नेक व्हेनम ही आहे. या बिअरमध्ये एकूण 68 टक्के अल्कोहोल असते. म्हणूनच ही बिअर पिताना काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जातो.
जे लोक नव्याने बिअर पितात त्यांही बिअर पिऊ नये, असे सांगितले जाते. बिअर हे सर्वात जुने मद्य मानले जाते. साधारण 4000 वर्षांपासून बिअर हा मद्यप्रकार तयार केला जातो, असे सांगितले जाते.
टीप- मद्याप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन करू नये. वरील स्टोरी ही प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. मद्यपानाची सवय लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.