Water Bottle : जिथं युद्ध भडकलं तिथं पाण्याची बॉटलची किंमत किती; आकडा वाचून धक्काच बसेल!

सध्या आखाती देश खूपच चर्चेत आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आखाती देशाची अर्थव्यवस्था, तेथील व्यवसाय, उद्योग याबाबत बोललं जात आहे. नैसर्गिक वायू, कच्चे तेलाच्या मदतीने येथील देश आपली प्रगती करत आहेत. या देशात गोड पाण्याचे स्त्रोत खूपच कमी आहेत.

| Updated on: Mar 13, 2026 | 12:15 AM
1 / 5

2 / 5

गोड पाण्याचा स्त्रोत कमी असल्यामुळे आखाती देश हे पिण्याच्या पाण्यासाठी समुद्राच्या पाण्यावर अवलंबून आहेत. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्यातून गोड पाणी मिलवले जाते. नंतर हेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. समुद्रातील खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करणे हे खूपच खर्चिक आहे.

3 / 5

त्यासाठी खूप पैसे लागतात. त्यामुळेच गोड पाण्याची किंमतही आखाती देशात जास्त आहे. आकड्यात बोलायचे झाल्यास गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल देशांमध्ये दीड लिटर बॉटलबंद पाणी हे 0.14 कुवैती दिनार म्हणजेच साधारण 38 ते 40 रुपयांना विकले जाते. प्रिमियम ब्रँडची बॉटल तिथे 125 रुपयांना विकली जाते.

4 / 5

संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबईसारख्या शहरात दीड लीटर पाण्याची बॉटल 45 ते 68 भारतीय रुपयांना विकली जाते. प्रिमियम ब्रँडच्या बॉटलची किंमत तिथे 225 रुपये असते. सौदी अरेबियातही दीड लिटर पाण्याची किंमत SAR 2.28 म्हणजेच साधारण 50 रुपये आहे. प्रिमियम बॉटलची किंमत तिथे 400 रुपये आहे.

5 / 5

आखाती देशांच्या तुलनेत भारतात पाणी खूपच स्वस्त आहे. भारतात एक लीटर पाण्याची बॉटल 20 रुपयांना मिळते. भारतात काही ठिकाणी गोड पाणी मोफत मिळते. आखाती देशात मात्र तशी परिस्थिती नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us